अहरी: ख्रिसमस (नाताळ) सणानिमित्त माजी पंचायत सभापती यांनी अहेरी तालुका कोरेपली येते ख्रिश्चन बांधवांच्या चर्चा आहे तेथे भेट देऊन केक कापुन शुभेच्छा दिले.
ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस (नाताळ) हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. युरोपियन देशात या दिवसाचं औचित्य साधत शोभायात्रा काढल्या जातात. यातून प्रभू येशूंची जीवनकार्य दाखवलं जातं. हा सण ख्रिस्ती धर्मियांसोबत इतर धर्माचे लोकही साजरा करतात. या सणाबद्दल लहान मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. महिनोंमहिने या दिवसाची मुलं आतुरतेने वाट पाहात असतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना भेटवस्तू देतात, अशी मान्यता आहे. पालक त्या रुपाने मुलांना भेटवस्तू देत असतात.
याचेच औचित्य साधून माझी सभापती यांनी कोरेपली येते ख्रिस्ती धर्मीय बांधवांच्या चर्चा ला भेट देत त्यांच्यासोबत नाताळ सण साजरा करत केक आणि गोड पदार्थ भेट देऊन नाताळ सणानिमित्त शुभेच्छा दिले.यावेळी ग्राम पंचायत सदस्य इरपा गावडे, गिल्ला गावडे, माजी उपसरपंच संजय पोरतेट, नामदेव पेंदाम, सुरेश पेंदाम, पास्टर पिस्टन गावडे, राकेश गावडे, सुधाकर कन्नाके व विश्वाशू उपस्थित होते.