रवि बारसागांडी सिरोंचा तालुका प्रतिनिधी
गांधी कुटुंबीयांनी देशाची सेवा स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन केली आहे – रवी बारसांगडी सामाजिक कार्यकर्ता
सिरोंचा: तालुक्यातील जाफराबाद येथे रवि बारसांगडी यांनी आपल्या स्वतःच्या घरी दिनांक ९ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीचा जाफराबाद गावातील सर्व चिमुकल्यांसह केक कापून साजरा केला. यावेळी चिमुकल्यांना अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी बोलताना बारसांगडी म्हणाल्या, गांधी कुटुंबीयांनी देशाची सेवा स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन केली आहे. सोनिया गांधी यांच्या त्यागाची भूमिका ही खूपच मोठी गोष्ट आहे, त्यामुळे आज सोनिया गांधी यांचा वाढदिवस हा गावातील चिमुकल्यांसह साजरा करण्याचा माझा मानस होता. जाफराबाद येथील आपल्या स्वतःच्या घरी सर्व गावातील चिमुकल्यांसह केक कापून वाढदिवस साजरा केला.
यावेळी या सर्व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप मोठा होता.
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीने सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा केला.
त्यामुळे या सर्व चिमुकल्यांचा आशीर्वाद सोनिया गांधी यांना मिळणार आहेत.
माझ्याकडून देखील सोनिया गांधी यांना दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करते,
असे मनोगत बारसांगडी यांनी व्यक्त केले.
यावेळी ए बि के न्युजचे वार्ताहर साईनाथ दुर्गम, आर्टिकल न्युजचे संपादक आनंदराव अशा,टेकडात्ला येथील देशोन्नतीचे वार्ताहर शेखर तानीर आणि गावातील चिमुकल्यांसह गावकरी उपस्थित होते