सिरोंचा तहसील कार्यालय समोर गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण केले होते, ह्यात शेतकऱ्यांना वीजपुरवठा हे ८ तास वरून १२ तास करण्याची प्रमुख मागणी होती, ह्या उपोषणाची माहिती मिळताच सिरोंचा येथे जाऊन माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आंदोलनकर्त्यांशी बराच वेळ सकारात्मक चर्चा केली आणि त्यांचे उपोषण सोडविले होते, ह्यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन राजेंना दिले होते त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून शेतकऱ्यांना १२ तास विज देण्याची त्यांची प्रमुख मागणी पूर्ण केली आहे, ह्याबाबतचा आदेश काल २९ नोव्हेंबर रोजी काढण्यात आले आहे..!!
ह्या निर्णयाने सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना फायदा होणार असून त्यांना वर्षांतून दोन पिके घेणे शक्य होणार आहे, 1) सूर्यापल्ली 2) नंदिगाव 3) तमांदाला 4) भोगापूर 5) कारस्पल्ली 6) नारायपूर 7) अमरावती 8) मॅरिगुडम 9) आदीमुत्तापूर 10) तिगलगूडम ह्या प्रमुख गावातील शेतकऱ्यांना ह्या निर्णयाने दिलासा मिळाला असून त्यांनी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे आभार मानले आहे..!!