दिड महिन्यापासून फळ व पंधरा दिवसांपासून जेवण न मिळण्याची विद्यार्थ्यांची तक्रार
अहेरी:- अहेरी येथिल शासकीय आदिवासी मुली व मुलांच्या वसतिगृहाला अखील भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष यांची भेट.
सतिश पोरतेट हे नेहमीच आदिवासी विद्यार्थ्यांचे समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत असतात.अशातच शासकीय आदिवासी मुलींचे व मुलांचे या दोन्ही वस्तीगृहात मागील दिड महिन्यापासून फळ ,अंडे व पंधरा दिवसांपासून जेवण न मिळण्याची माहिती विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे तालुका अध्यक्ष सतिशभाऊ पोरतेट यांना कळविताच यांनी वस्तीगृहाची भेट घेतली.
या दोन्ही वस्तीगृहाला जेवण व फळ, अंडे पुरवठा करण्याचे सावित्री माई सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था, धुळे या संस्थेला देण्यात आला आहे. मात्र गेल्या दिड महिन्यापासून फळ, अंडे पुरवठा संस्थे मार्फत ठप्प झाला आहे. व पंधरा दिवसांपासून जेवण पण मिळत नसल्याने गेल्या १५ दिवसांपासून या वस्तीगृहाचे गृहपाल हे स्वखर्चातून विद्यार्थ्यांचा जेवणाची सोय करित आहेत असे यावेळी लक्षात आले.
सदर प्रकरण लक्षात घेत अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे मुलचेरा अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी तात्काळ संस्थाचालक शिंदे यांना भ्रमणध्वनी व्दारे चांगलेच धारेवर धरले असता येत्या चार ते पाच दिवसांत नियमित पुरवठा करण्यात येईल अशी माहिती संस्थाचालक शिंदे यांनी दिली.
सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, किचन, शौचालय आदींची पाहणी केली. वस्तीगृहातील मुलांशी चर्चा करत, तुमच्या काहि समस्या असतिल त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन यावेळी सतीशभाऊ पोरतेट यांनी विद्यार्थ्यांना दिले.