नवनिर्वाचित सदस्य भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम)यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केले.
सिरोंचा:-* माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम)यांनीही उपस्थितीत कार्यकर्त्यांना संबोधित करतांना म्हंटले आहे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मधून राष्ट्रवादीत येण्याचे घेतलेले निर्णय हा काही पक्षाच्या नेत्यांच्या सहमतीनंतर झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक राजकारणातील काही गोष्टींमुळे इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश केलं असल्याचे म्हंटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे.त्यामुळे या पक्षात आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असा विश्वास त्यांनी सर्व नवीन सदस्यांना दिला आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात कोनासोबतही दुजाभाव होत नाही.विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या पक्षात येण्याची भूमिका ही अत्यंत विचारपूर्वक घेतली आहे.सिरोंचा तालुक्याचा विकासासाठी हा निर्णय त्यांनी घेतली आहे. सिरोंचा ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांकडे आमचे लक्ष वेधलं आहे.त्या प्रश्नांना योग्य न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही देत नवीन सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठनेते कॅबिनेटमंत्री(अन्न व औषधी प्रशासन)विभागाचेमंत्री मा.ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वागत केले आहे.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लुरी●उपाध्यक्ष श्री.सत्यम पिडगु●नगरसेवक श्री.जगदीश राल्लाबंडीवार●नगरसेवक श्री.रंजित गागापुरपू●नगरसेविका सौ.सपना सम्मया तोकला●रा.युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एम.डी.शानु●वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सह.अध्यक्ष श्री.मदनय्या●उपसरपंच श्री.नागराजू गणपती●पंचायत समितीचे माजी सदस्य श्री.शानगोंडा प्रभाकर●प.स.माजी सदस्य जम्पय्या दुर्गम●नावेद●आदी होते.
तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम