महोत्सव अर्बन बँकेचे रौप्य महोत्सव ना.सुधिरभाऊ मुनगंटिवार यांच्या हस्ते पार पडणार

50

ब्रम्हपुरी :अर्बन को.ऑप.बॅक लिमिटेड या बॅकेचे “रोप्य मोहोत्सवी”निमित्याने “स्मरणिकेचे विमोचन”कार्यक्रम सोहळा दिनांक 03 डिसेंबर 2022 रोजी शनिवार ला दुपारी 12.00 वाजता विठ्ठल रूख्मिनी सभागृह आरमोरी रोड ब्रम्हपुरी येथे अर्बन को.ऑप.बँकेचे रौप्य महोत्सव व स्मरणिकेचे प्रकाशन सोहळा नामदार सुधिरभाऊ मुनगंटिवार वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्य विभाग मंञी महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननिय रामजी हरकरे विदर्भ प्रांत संघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,राहणार आहेत.तर प्रमुख उपस्थिती म्हणून जयंतराव खरवडे चंद्रपूर विभाग संघ चालक रा.स्व.संघ,अशोकजी नेते खासदार चिमूर गडचिरोली निवार्चण क्षेञ,अनिलजी सोले माजी शिक्षक आमदार नागपूर,सतिशजी मराठे संचालक रिजर्व्ह बॅक ऑफ इंडिया,संजयजी कदम विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था नागपूर,विवेकजी जुगादे महामंञी सहकार भारती महाराष्ट्र राज्य,श्रीकांतजी सुपे सेवा निवृत्त,विशेष लेखापरिक्षक,वर्ग 01 नागपूर आदी मान्यवर कार्यक्रमा दरम्यान उपस्थित राहणार आहेत.
                 चंद्रपूर जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रगती करीत ब्रम्हपुरी अर्बन को.ऑफ.बँक लि.या मुख्य शाखेने उतुंग भरारी घेत ब्रम्हपुरी,भद्रावती,चिमूर या शहरात शाखेचा विस्तार केला.या मुख्य शाखेस 25 वर्ष पूर्ण झालेत.या निमित्याने येत्या 03 डिसेंबर 2022 रोजी ब्रम्हपुरी अर्बन को.ऑफ.बँक लिमिटेड.रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करीत तसेच मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन सोहळा कार्यक्रम साजरा होत आहे.अशी माहिती प्रा.अतुल देशकर माजी आमदार तथा अध्यक्ष ब्रम्हपुरी अर्बन को.ऑफ बँक लिमिटेड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.आयोजित पञकार परिषदेत ब्रम्हपुरी अर्बन को.ऑप.बॅक लिमिटेड चे उपाध्यक्ष रविंद्र आष्टेकर,माजी उपाध्यक्ष डाॅक्टर विलास गजपुरे,संचालक किशोर बुरांडे,मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत श्रीवास्तव आदी उपस्थित होते.