बोलेपल्ली येथील कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे हस्ते उदघाटन

45

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती*

     मूलचेरा:तालुक्यातील बोलेपल्ली येथे जय महादाखंडी क्रिडा मंडळाकडून ग्रामीण मुलांसाठी कबड्डी व व्हॉलीबॉल तर मुलींसाठी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आला.या दोन्ही सामन्यांचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उदघाटन समारंभाला सह उदघाटक म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर अध्यक्ष म्हणून येथील  पोलीस पाटील मनोहर तिम्मा प्रमुख पाहुणे म्हणून गाव भूमिया मस्तरी झोरे,आविस एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,सरपंच केसरी पाटील तेलामी,उपसरपंच संतोष कुडयेटी, सरपंच गणेश हलामी,मूलचेरा नगरसेविका सुनिता ताई कुसनाके, मूलचेरा नगरसेवक बंडुजी आलाम ,नगरसेवक संतोष चौधरी ,उपसरपंच वैशालिताई दुर्गे, माजी सरपंच मारोती पल्लो, ग्रा,प सदस्य सीताराम पल्लो , माजी प,स सदस्य वनिता ताई तिम्मा ,पोलीस पाटील कोत्तुजी नरोटे ,ग्रा,प सदस्य रमेश तिम्मा ,शामराव लेकामी , सौ, जत्तेबाई झोरे ,आविस सल्लागार चल्लावार काका, आविस एटापल्ली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी सरपंच विजय कुसनाके, आकाश नागोसे,नानाजी कुडयेटी आदी मान्यवर उपस्थित होते.

           या दोन्ही सामन्यांची उदघाटन येथील क्रीडांगणावर मैदानाची विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

             यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित खेळाडूंना कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही मैदानी खेळांविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.

       या दोन्ही सामन्यांचे उदघाटन सोहळ्याला बोलेपल्ली येथील नागरिकांची,खडाळू व क्रीडाप्रेमींची प्रचंड गर्दी होती.