महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या छताचे अनावरण अहेरी: पुरोगामित्वाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आजवर अनेक महापुरुषांनी योगदान दिले आहे. स्त्री शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याला यथोचित सन्मान मिळायला हवा, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने नागेपल्ली येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या छताचे अनावरण त्यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पुष्पा अलोने,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार,उपाध्यक्ष आरती डुकरे,सचिव मंगला गोबाडे,सदस्य संध्या मुंगमुडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,नागेपल्लीचे उपसरपंच रमेश शानगोंडावार,सदस्य मलरेड्डी येमनूरवार,कांचनलाल वासनिक,प्रकाश चुनारकर,धर्मजी गुरनुले, गणपत गुरनुले,मोहन खोब्रागडे, योगेश्वरी मोहूर्ले, मारोती सूनतकर,गीता दुर्गे,स्मिता निमसरकर, लक्ष्मीबाई सिडाम,ज्योती ठाकरे, सविता गुरनुले,गणेश चौधरी,लता मोहूर्ले,विमल गुरनुले,लक्ष्मण मोहूर्ले, नानाजी कोटरंगे, विनोद कोटरंगे, राकेश आदे, अशोक मोहूर्ले,कल्पना गुरनुले,श्रीनिवास निकोडे,ज्योती कोटरंगे,चंद्रकला मोहूर्ले,गीता निकोडे,अंजन्ना गुळदे,मायाबाई सूनतकर,चंद्रकला ठाकरे,सविता आदे,कमलाबाई कोटरंगे,अनिता गुरनुले,वंदना निकोडे,चंद्रकला मोहूर्ले,पंचफुला वाढगुरे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना केवळ सावित्रीबाई फुलेच नाहीतर,महात्मा फुले हे मराठी लेखक,विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.त्यावेळी भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारण्याचे काम केलं. या काळात मुलींचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रूढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागेपल्ली गावात रॅली काढण्यात आली.त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या छताचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर पार पडलेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी नागेपल्ली परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
स्त्री शिक्षणात सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे:भाग्यश्री ताई आत्राम
नागेपल्ली येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी