अशोक आईंचवार
शहर प्रतिनिधीअहेरी
*अहेरी-**क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अर्थात फुले दांम्पत्यांनी संघर्षमय जीवनातुन नवा समाज घडविले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी केले.
ते येथील वीर बाबूराव शेडमाके चौक , युवा शक्ति गणेश मंडळाच्या भव्य पटांगणावर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले युवा संघर्ष समिती तथा युवा शक्ति गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोहात प्रमुख अतिथिच्या स्थानावरुन बोलत होते.
यावेळी उदघाटन स्थानी सुवर्णपदक विजेत्या व अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अर्धांगिनी नम्रता ओतारी होते तर अध्यक्षस्थानी एडवोकेट प्रीती डंबोळे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथि म्हणून नगर सेविका शालीनी पोहनेकर, ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र गुरुनुले, सेवा निवृत्त तहसीलदार नामदेव गुरुनुले, अशोक निकुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे म्हणाले की, फुले दांम्पत्य मोठ्या कष्टातुन व परिश्रमातून नवा समाज घडविले असून , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानले असे महान कार्य फुले दांम्पत्यांचे असून नवा समाज घडविले असे म्हणत सुरेंद्र अलोणे यांनी या थोर महापुरुषांचे कार्य आत्मसाद करून व प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी नगरसेविका शालिनी पोहनकर, नम्रता ओतारी, प्रीति डंबोळे, रामचंद्र गुरुनुले आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर गाऊत्रे यांनी तर सूत्रसंचालन दीपक गुरुनुले यांनी केले. उपस्थितांचे आभार राजकिरण गुरुनुले यांनी मानले.यावेळी बहुसंख्यने समाज बांधव व नागरिक उपस्थित होते. यशस्वितेसाठी युवकांनी परिश्रम घेतले.







