छल्लेवाडा येथे बालिका दिन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 192वी जयंती साजरी

40

अशोक आईंचवार 
 प्रतिनिधीअहेरी 
आलापल्ली :- आज दिनांक 03जानेवारी 2023रोज मंगळवारला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती बालिका दिन म्हणुन साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा व गावकरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक गट्टूजी गुरनुले पोलिस पाटील हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.शांताबाई मदनय्या गुरनुले, उपाध्यक्षा अनिता श्रीनिवास शेंडे, प्रमुख अतिथी सौ.लक्ष्मी मडावी सरपंचा ग्रामपंचायत रेपनपल्ली,शालूबाई लेंडगुरे,मलाक्का लेंडगुरे,कल्पना रागिवार मुख्याध्यापिका,राजक्का लेंडगुरे,नानुबाई  मोंडीमेरा गुरनुले,पद्मा गुरनुले,व्येंकुबाई कोंगलवार,शांता कावळे,नानुबाई गुरनुले,विजयालक्ष्मी कडार्लावार,मनिषा ताटीवार,नागमणी गद्दलपल्लीवार अंगणवाडी सेविका, हे होते.सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांनी गावात सावित्रीबाई फुले ग्रंथदिंडी  काढण्यात आली.त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रम स्थळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे  मान्यवरांचे शुभहस्ते पूजन करण्यात आले व स्वागत समारंभ पार पडला.यावेळी गावकरी मंडळींना कल्पना रागिवार मुख्याध्यापिका यांनी मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे बाबुराव कोडापे,रघुपती मुरमाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महिती सांगितली.
तसेच विविध वेषभुषा परिधान केलेल्या विद्यार्थीनींनी आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत.यांच्यामुळेच आम्ही आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहोत.हे वेषभुषेतून आपले मनोगत व्यक्त केले.गावात रॅली काढण्यात आली.सर्वांना नास्ता वाटप करण्यात आला.सुंदर असे आयोजन गावकऱ्यांनी केले. सदर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरजलाल येलमुले प्राथमिक शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन फुलसिंग जाधव प्राथमिक शिक्षक यांनी केले.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला,शिक्षकवृंद, नवयुवक तरुण तरुणी, शेतमजूर ,शेतकरी,शालेय विद्यार्थी,जेष्ठ महिला आदी बहुसंख्येने उपस्थित