तालुका प्रतिनिधी मुलचेरा
मुलचेरा – चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्राच्या हद्दी अंतर्गत सुभाषग्राम – घोट मार्गावरील ठाकूरनगर येथील घटना दुचाकीचा भरधाव वेग तीन तरुणांच्या जिवनयात्रेला लागला ब्रेक. चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्राच्या हद्दी मौजा सुभाषग्राम – घोट मार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित होवून झाडाला धडक बसल्याने दुचाकी वरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 17 एप्रिल गुरुवारी सकाळी साडे नऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली. झाडाला धडक बसल्याने दुचाकी ही जळून खाक झाली. मृतात दोन सख्या भावाचा समावेश आहे.
साहेब सुभाशिष चक्रवर्ती, वय वर्ष(16) रा. वसंतपुर,सौरभ सुभाशिष चक्रवर्ती, वय वर्ष (20) रा. वसंतपुर,विशाल भुपाल बच्छाड, वय वर्ष(19) रा. 10 नंबर, शिरपूर, तेलंगणा. प्राप्त माहितीनुसार अशी मृतांची नावे आहे.
वसंतपुर येथील साहेब चक्रवर्ती, सौरभ चक्रवर्ती या दोन भावंडासह त्यांचा तेलंगणा येथील नातेवाईक विशाल बाछाड हे तिघे जण वसंतपूर येथून घोट कडे दुचाकीने जात असताना ठाकूरनगर पहाडी जवळील वळणाजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित झाल्याने थेट सागवानच्या झाडाला जोरदार धळली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
आणि दुचाकी ही जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच घोट पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक नितेश गोहणे यांच्या पथकासह घटना स्थळी दाखल झाले. मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास घोट पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार नितेश गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.