प्रतिनिधी// केजिकराव आरके
मूलचेरा: तालुक्यातील आंबटपली येथील रघुनाथ कलसार यांचे सुपुत्र मनोज यांचा विवाह दिघोरी येथील गजानन कस्तुरी यांची कन्या देविका हिच्याशी दिनांक १४/४/२०२५ रोजी दिघोरी येथे संपन्न झाला होता.
त्या निमित्ताने विवाह स्वागत समारंभ दिनांक १५ एप्रिल रोजी आंबटपली येथे आयोजित करण्यात आले.
सदर स्वागत समारंभास शिवसेना नेते संदीपभाऊ कोरेत यांनी उपस्थित राहून नवं वधु-वरास भेट वस्तू देऊन पुढील संसारिक जीवनास शुभेच्छा दिले.
या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत, अमित बेझलवार, सरपंच उमेश कळते,मिलिंद आलाम आदी उपस्थित होते.