सावली खेडी ट्याजवळील घटना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

110

सावली : कामावरून घरी जात असताना नियतीने घात केला आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत तो जागीच ठार झाला. ही घटना आहे मुल –  सावली मार्गावरील खेळीफाट्या जवळची. 
काल नेहमीप्रमाणे सामदा बुज येथील रहिवासी 30 वर्षीय प्रफुल सुरेश मडावी हा कामावरून आपल्या दुचाकी क्र. एम एच 33 इ 3291 ने घरी जात असतांना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास खेडी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने प्रफुल चा जागीच मृत्यू झाला. घटने नंतर वाहनचालक तिथून पसार झाला. या घटनेची माहिती सजग नागरिकांनी सावली पोलीस स्टेशन ला देण्यात आली. घटना स्थळावर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकारिता प्रार्थमिक आरोग्य केंद्र सावली येथे पाठविण्यात आले असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.  रस्ते अपघातात.  वर्षभरात  साडेचारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला.  त्यापैकी 272 मृत्यू दुचाकीस्वरांनी हेल्मेट न घातल्याने झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.  त्यामुळे नागरिकांनी आता तरी सावधानी बाळगावी आणी हेल्मेट चा उपयोग करावा असे आव्हान जिल्हाधीकारी विनय गौडा यांनी  केले आहे.