राम मंदीरासाठी अयोध्येला जाणार्‍या सागवानची पाहणी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी साॅ-मीलला दिली भेट

43

अयोध्येचे राम मंदीर देशात सर्वात जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.९० च्या दशकात देशभरातुन त्यासाठी विटा पाठविल्या गेल्या होत्या.
अहेरी:सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदीर निर्माण कार्य सुरु होताच प्रत्येक रामभक्ताने यथाशक्ती आपला खारीचा वाटा पाठविला आहे.तेथे आता या भागातील जगप्रसिध्द सागवान लाकडाची निवड झाली आहे. आलापल्ली येथील वनविकास महामंडळाच्या साॅ-मील मध्ये तो लाकुड गोळा करण्यात येत आहे तेथे राजे अम्ब्रीशराव महाराजांनी देऊन पाहणी केली.आपल्या भागातील साहीत्याची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची तसेच सौभाग्याची बाब आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी रविभाऊ नेलकुद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी, पप्पूदादा मद्दीवार भाजपा महामंत्री, योगेश शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली, टायगर ग्रुपचे साई तुलसीगिरी,दौलत रामटेके,सूचित कोडेलवार, आशुतोष पीपरे, विक्की तोडसाम, क्रीष्णाजी मंचर्लावार सर, गुड्डू ठाकरे हे उपस्थित होते.