मुलचेरा:- आष्टी-आलापल्ली-अहेरी तसेच लगाम मार्गाने जाणारे लोखंड, सिमेंट, गिट्टी व इतर सामान वाहतूक करणारे जड वाहन/ट्रक हे आष्टी, मार्कंडा- मुलचेरा मार्ग अलापल्लीला जात असल्याने स्थानिक शाळकरी मुले व प्रवाशांना नाहक त्रासाला सामोर जावं लागत आहे.
मुलचेरा ते आलापल्ली रोड हा अरुंद असल्याने व जास्त प्रमाणात या मार्गाने वाहतूक होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आणि गेल्या तीन महिन्यांत चार अपघात व प्राणहानी झाली आहे. याकरिता मुलचेरा मार्गे जाणारे जड वाहनांना प्रतिबंध लावुन चालकांना योग्य मार्ग जाण्यास लावावे जेणे करून भविष्यात शाळकरी मुले व प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही व जिवीत हानी होणार नाही. अशी मांगणी मुलचेराचे तहसीलदार साहेब यांना अखील भारतीय आदिवासी विकास परिषद,मुलचेरा व नागरिक यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी उपस्थित अ.भा.आ.वि.प. तालुका युवा अध्यक्ष सतीश पोरतेट, अरुण कडते सरपंच ग्रा.पं. मल्लेरा, रेखनकर गर्तुलवार सदस्य ग्रा.पं. मल्लेरा, केसरी तेलामी सरपंच ग्रा.पं. देवदा,संदीप तोरे सदस्य ग्रा.पं देवदा, संतोष तुमरेठी उपसरपंच ग्रा.पं. देवदा, केजिकराव आरके, रंजीत आलाम, सुरज सिडाम, निखिल आत्राम, सत्यवान सिडाम,साईनाथ अत्राम उपस्थित होते.
अवैध जड वाहतुकीस प्रतिबंध लावण्यात यावे.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, व नागरिकांच्या वतीने तहसीलदार साहेब यांच्याकडे मांगणी