# B.J.Pअहेरी विधानसभा क्षेत्रात परीक्षा पे चर्चा उपक्रम अंतर्गत चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद.

37

अहेरी :प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतुन परीक्षा पे चर्चा ह्या उपक्रमाअंतर्गत माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार मा.अशोकजी नेते, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेवजी फाये यांच्या मार्गदर्शनाखाली 
पंडित दीनदयाळ उपाध्याय विचार मंच तथा भाजपा युवा मोर्चा द्वारा काल आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला अहेरी विधानसभा क्षेत्रात विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
         अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड आणि मूलचेरा येते एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या ह्या चित्रकला स्पर्धत 9 ते 12 पर्यतच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन दिलेल्या विषयांवर उत्कृष्ट असे चित्र रेखाटले आहे, प्रत्येक तालुक्यातील प्रथम 3 विद्यार्थ्यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार आणि 2 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
       ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, जिल्हा सचिव सतीश पदमतींटी, अहेरी तालुका अध्यक्ष गुड्डू ठाकरे, एटापल्ली तालुका अध्यक्ष संपत पैडकुलवार, मूलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, भामरागड तालुका अध्यक्ष समीर रॉय, सिरोंचा तालुका अध्यक्ष राजेश संतोषवार यांच्या सह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले..