लंडनहून ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ सन्मानाने गौरवलेले माजी मंत्री तथा आमदार मान. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा चंद्रपूरात मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते सत्कार_

122

चंद्रपूर : दि. ३० ऑगस्ट २०२५
लंडन येथे नुकत्याच झालेल्या भव्य समारंभात लोकनेते, माजी मंत्री तथा आमदार मान. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल झाला. जनसेवा, प्रामाणिक नेतृत्व व विकासकार्य यांचा गौरव म्हणून मिळालेला हा सन्मान केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः अभिमानाचा क्षण ठरला आहे.

या पार्श्वभूमीवर आज चंद्रपूर येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी मान. सुधीरभाऊंची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. नेते यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ अर्पण करून मिठाई भरवली आणि भाऊंच्या यशाचा आनंद व्यक्त केला.

सत्कार प्रसंगी भावना व्यक्त करताना डॉ. नेते म्हणाले –
“जनतेच्या सेवेसाठी अखंडितपणे कार्यरत राहून, विकासाच्या मार्गावर सतत पुढे नेत असलेल्या सुधीरभाऊंना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान आपल्यासाठी मोठा अभिमान आहे. या गौरवामुळे महाराष्ट्राचं मान अधिक उंचावलं असून महाराष्ट्राची शान वाढली आहे.”

सत्काराच्या या सोहळ्यावेळी परिसरात उत्साह, अभिमान आणि आनंदाचे वातावरण पसरले होते.