विड जिल्ह्यात सन २०२१ मध्ये भूसंपादन अधिकारी या पदावर कार्यरत असतांना तब्बल पाच गुन्हे दाखल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून रुजु होऊन नुकतीच बदली करण्यात आलेल्या प्रकाश सौंदाजी आघाव पाटिल हे एकुणच गुन्हेगारी पार्शवभूमीचे तसेच भ्रष्ट अधिकारी असल्याची कारकीर्द गाजली आहे. असे असतांना गडचिरोली जिल्ह्यात सिएमआर मिलींग घोटाळ्यातील मुख्य सुत्रधाराच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे नुकतेच केलेल्या कारवाई वरून समोर येऊ लागले आहे. यावरून प्रकाश पाटील यांनी या प्रकरणात शासनाची दिशाभूल करून कोट्यावधी रुपये कमावल्याची दाट शक्यता लक्षात घेता पाटिल यांच्या संपत्तीची चौकशी होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.
दरम्यान देसाईगंज येथील एका कथित बड्या राईसमिलर्सकडुन सिएमआर मिलींग गैरव्यवहार प्रकरण संदर्भात कोट्यावधिची
आर्थिक देवाणघेवाण झाल्याच्या अनेक ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डीग संबंधित राईसमिलर्सकडे असल्याने पाटिल यांनी दबावात येऊन देसाईगंज राईसमिलर्सना येथील चार बजावलेल्या बजावल्याने प्रकरणातील गंभीर आपल्याच नोटिशीची अवहेलना केली असल्याचे सांगीतले जात आहे. दरम्यान मोजक्याच राईसमिलर्सवर चुकिची कारवाई करण्यात मौलिक भुमिका त्रुट्या प्रकाश पाटील यांना चांगल्याच भोवणार असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे. आघाव पाटिल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील जनता राईसमिल, देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील मा शारदा फुड प्रॉडक्ट, देसाईगंज येथील सोनल पोहा उद्योग तसेच अजय राईसमिल यांचेवर जीवनावश्यक वस्तु अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. परंतु देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील जय अम्बे राईसमिल मध्ये शासकीय तपासीत तब्बल ५ हजार ६३१
क्विंटल धान कमी आढळून आले आहेत.
वीजेचा वापर अत्यल्प झाल्याचे तसेच भरडाईच्या तुलनेत उघडकिस आले असुन बैंक गॅरंटीच्या तुलने ऐवजी जादा डिओ गायब करणाऱ्या राईसमिलर्सवर देणे, अशा गंभीर त्रुट्या आढळून आल्या आहेत. संदर्भिय चौकशी नुसार गंभीर त्रुट्या आढळून आल्या असतांना व मिल मध्ये धानच उपलब्ध नसल्याने धान सुरु आहे. वस्तु जीवनावश्यक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक असतांना पाटिल यांनी जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून सदर राईसमिलवर गुन्हा दाखल करण्याऐवजी फक्त तीन वर्षाकरीता काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान शासकीय धानाची अफरातफर झाल्याचे उघडकिस आले असतांना तसेच गडचिरोली जिल्ह्यात अनेक राईसमिलर्सनी धान भरडाईच्या तुलनेत वीज खर्च
केलेच नसल्याचे आदिवासी विकास महामंडळाच्या तपासणी पथकाने शासनाला
सादर केलेल्या अहवालात नमूद केले होते. सदर गंभीर बाब हंगाम २०२२-२३ मध्ये उघडकिस आली असतांना सुद्धा संबंधित राईसमिलवर कोणतीही कारवाई न करता भरडाईचे काम देण्यात आले असुन आजमितीसही
विशेष म्हणजे जिल्ह्यात सिएमआर तांदूळ जमा करण्याकरीता शासकीय गोडाऊन उपलब्ध असतांना तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून राईसमिलर्सना मानवी खाण्यास अयोग्य तांदूळ जमा जमा करणे सोयीचे होण्याकरीता देसाईगंज येथील खाजगी गोडाऊन घेणाऱ्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराच्या इशाऱ्यावर नाचत चक्क शासकीय नियमांना हरताळ फासल्याचे समोर येऊ लागले आहे. यामुळे या प्रकरणात पाटील यांनी देसाईगंज
येथील सिएमआर मिलींग गैरव्यवहाराचा सूत्रधार असलेल्या तंबाखु लाईनितील कुप्रसिद्ध छोटा बागडबिल्ल्याच्या माध्यमातून कोट्यावधिची कमाई केली असल्याचे सांगीतले जात आहे. प्रकाश पाटील हे आधिच गुन्हेगारी पाश्र्वभूमी व भ्रष्ट अधिकारी म्हणून चर्चेत असतांना गडचिरोली जिल्ह्यात २०२०-२१ पासुन सिएमआर मिलींग प्रकरण चांगलाच गाजत असतांना जिल्हा पुरवठा अधिकारीचा प्रभार का देण्यात आला? कोणाच्या आशीर्वादाने पाटिल यांनी गडचिरोली जिल्ह्यात सिएमआर मिलींग मध्ये प्रचंड घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजांना हाताशी धरून शासनाला कोट्यावधिने चुना लावला, याबाबत सखोल चौकशी करण्यात आल्यास अनेक घबाड उघडकिस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तथापी पाटिल यांच्या कार्यकाळात त्यांनी मिळवलेल्या चल अचल संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.