दुसरी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली – गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर

127

प्रतिनिधी//

रंगय्यापल्ली (ता.सिरोंचा), दि. 31 जुलै – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेडारम येथे दुसऱ्या शिक्षण परिषदेचे आयोजन उत्साहात पार पडले. परिषदेमध्ये निपुण भारत अभियान, क्षेत्र व पॅट बाबत कु. एस. आर. आकूलवार मॅडम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच इको क्लब समितीचे ध्येय व उद्दिष्टे श्री. मुडूमडीगेला सर यांनी समजावून सांगितली.

विद्यांजली पोर्टल, शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन, भौतिक सुविधा, निर्लेखन प्रक्रिया, यू-डाइज स्टुडंट मॉड्युल याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केंद्रप्रमुख श्री. आय.जे.खान यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

या शिक्षण परिषदेला गटशिक्षणाधिकारी श्री. डी. नीलकंठम साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. के. के. चव्हाण साहेब आणि साधन व्यक्ती बी. आर. सी. सिरोंचा येथील श्री. ए. मेश्राम सर यांनी आकस्मिक भेट देऊन विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले व परिषदेचा आढावा घेतला.

नवोदय प्रवेश परीक्षेचे शंभर टक्के फॉर्म भरल्याबद्दल श्री. एन. आत्राम सर यांचा ग. शि.अ.तथा शि.वि.अ.यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.