UDID ओळखपत्र शिबिराची माहिती देण्यासाठी विशेष शिक्षक व केंद्रप्रमुख यांची शाळेला भेट

108

प्रतिनिधी//

रंगय्यापल्ली , ता. सिरोंचा दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे आयोजित करण्यात आलेल्या UDID (Unique Disability ID) वैश्विक ओळखपत्र व मूल्यांकन प्रामाणिकरण शिबिराच्या अनुषंगाने संत मानवदयाल विद्यालय, बामणी व शासकीय आश्रमशाळा, बामणी येथे विशेष शिक्षक श्री. गेडाम सर आणि केंद्रप्रमुख मा. खान सर यांनी शाळेला भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी शिबिराची सविस्तर माहिती दिली. शिबिरामध्ये अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, प्रमाणपत्र तयार करणे आणि UDID ओळखपत्र वितरित करणे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शिक्षक व पालकांनी या माहितीचा लाभ घेतला. विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा वेळेत मिळाव्यात याकरिता हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे, असे मतही व्यक्त करण्यात आले.