वृक्षलागवडीद्वारे हरित महाराष्ट्राची वाटचाल — रंगय्यापल्ली शाळेत उत्साही सहभाग

216

प्रतिनिधी//

रंगय्यापल्ली, ता. सिरोंचा – ‘हरित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगय्यापल्ली येथे वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या उपक्रमात ग्रामपंचायत रंगय्यापल्लीचे सरपंच श्रीमती गौरक्का अर्का , नोडल अधिकारी श्री ए.एम. अगडे सर , मु.अ. श्री. मारबोईना सर, वि.शि. श्री वेलादी सर, श्री गेडाम सर,श्री फड सर, कु. साठे मॅडम आणि के.प्र. श्री.
खान सर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी शाळेचे विद्यार्थी आणि गावकऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

वृक्षलागवडीसाठी विविध फळझाडे, छायादार वृक्ष व औषधी वनस्पतींची निवड करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना अधिकाधिक झाडे लावण्याचे आणि त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमामुळे परिसरात हरित आवरण वाढण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. शाळेतील शिक्षकांचे आणि ग्रामस्थांचे सहकार्य या उपक्रमाच्या