प्रतिनिधी//
भमरागड: गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी बामणपल्ली ग्राम वासियाचा शिवसेना युवा नेता संदीप भाऊ कोरेत यांना पाचारण
गावातील समस्या विविध पक्षातील लोक प्रतिनिधींना सांगून कोणत्याच प्रकारचा समस्याचे निवारण होत नसल्याने शिवसेनेचे युवा नेता संदीप भाऊ कोरेत यांना गावात बोलावून बामणपल्ली ग्राम वासियानी गावातील विविध समस्या मांडल्या बामणपल्ली ग्राम वासियानी गावातील समस्या सांगताना बोलले की आमच्या गावात लाईट राहत नाही, पिण्याचे शुद्ध पाणी आम्हास मिळत नाही, गावातील रस्ते बरोबर नाही गावात असलेल्या अस्वच्छतेमुळे ग्राम वासियांची प्रकृती वर विपरीत परिणाम होऊ शकते या साठी तुम्ही पुढाकार घ्यावा असे आव्हान ग्राम वासियानी केला असता संदीप भाऊ कोरेत यांनी त्यांच्या समस्या ऐकून तुमच्या समस्या रास्त आहे आणि ते शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले तेव्हा उपस्थिती राकेश बिरडू, दिवाकर मेडि राजेश पोलमपल्ली मलया नीलम, तुळशीराम हजारे, सुनील तानसेल निलेश नीलम, विनोद तानसेल, राजू नीलम अर्जुन बडगेल बोंदया आलम अनिल नीलम भगवान बडगेल नागेश आलम, सुबय्या कोरेत रघुपती आलम, अनिल आलम बाबुराव बडगेल व इतर गावातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते