भामरागड-
*गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊसामुळे पुराने थैमान घातले होते. स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असतानाही भामरागड तालुका विकासापासून कोसो दूर आहे. रस्त्यांची तर दयनीय अवस्था आहेच मात्र अनेक नाल्यावर पुल नसल्याने व काही नाले व नदीवरील पुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यामुळें अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे*.
*गेल्या महिन्यात भामरागड तालुक्यात पुराच्या पाण्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला. पुर ओसरताच शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत व शिवसैनिकांनी भामरागड तालुका गाठत मृतक चार जणांच्या कुटुंबीयांची 16 सप्टेंबर मंगळवारी घरी जावून सांत्वनपर भेट घेतली व मदतीचा हात दिला*.
*भामरागड तालुक्यातील कोडपे गावचा लालचंद कपिलसाय लकडा, शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असताना जोनाबाई येथील शिक्षक असंतू सोमा तलांडे, भटपार येथील तोका डल्लू मज्की, व सहा वर्शिय बालक रीशान प्रकाश पुंगाटी यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला अन् त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. या चारही मृत कुटुंबियांच्या घरी शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी भेट घेतली व मदतीचा हात दिला यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत पुन्हा कुणाचा जीव जावू नये यासाठी भामरागड तालुक्यातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी, रस्त्यांची व नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेवुन शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगीतले. व भामरागड तालुका राज्यपालांनी दत्तक घेतल्यानंतरही ही अवस्था असल्याची खंतही व्यक्त केली व या समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला*
*यावेळी शिवसेनेचे भामरागड तालुका प्रमुख सुधाकर तिम्माअरुण सेडमाके वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष, साई चंदनखेडे युवा सेना उपजिल्हा प्रमुख, चत्रु मडावी, भंवरसाय माझी, संतोष बारापात्रे त कपिल पाल अमोल पंदिलवार आकाश पुपलवार रवी भांडेकर व गावकरी उपस्थित होते*