राष्ट्रीय महामार्गाच्या भोंगळ कारभाराविरोधात जनतेचा उद्रेक!

67

गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत, चुकीच्या नियोजनाबाबत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात आज भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आम्ही जनतेचा आवाज बुलंद केला.

धानोरा व चामोर्शी तालुक्यातील शेकडो नागरिकांना या दुर्व्यवस्थेचा फटका बसत असून वाहतुकीत होणारा अडथळा, अपघातांचा धोका आणि लोकांच्या सुरक्षिततेशी होत असलेला खेळ या सर्वाचा आम्ही तीव्र निषेध नोंदवला.

गडचिरोलीकरांच्या हक्कांसाठी, रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी व सुरक्षित प्रवासासाठी आमची लढाई सुरूच राहील.

वारंवार राष्ट्रीय महामार्ग यांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज आम्हाला त्यांच्या कार्यालयात जाऊन थेट धडक देत हिशोब विचारावा लागला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा सचिव श्री सारंगजी साळवे, भाजपा गडचिरोली ग्रामीण तालुकाध्यक्ष श्री दत्ततुझी सूत्रपवार, गडचिरोली शहराध्यक्ष श्री अनिलजी कुनघाडकर, धानोरा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री श्री. आकाशजी सातपुते, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री प्रशांतजी कोटगले, भाजयुमो शहराध्यक्ष श्री. साई सिलमवार, नगरसेवक धानोरा श्री. संजयजी कुंडू व सहकारी उपस्थित होते.