सावलीत सुगंधित तंबाखूचा साठा जप्त #jantechaawaaz#news#portal#

111

सावलीत सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
सावली पोलिसांची कारवाई
संपूर्ण राज्यामध्ये सुगंधित तंबाखूवर बंदी असतांनाही सुगंधित तंबाखूची विक्री आणि वापर सर्रासपणे सुरु आहे.अशातच आज दिनांक १ एप्रिल रोजी सावली पोलीसांनी सुगंधित तंबाखूचा साठ जप्त करून मोठी कारवाई केली

 आहे. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू साठवून ठेवले असल्याची माहिती प्राप्त होताच सावली पोलिसांनी छापा 

टाकला. यामध्ये सुगंधित तंबाखू हुक्का किमत ६०,००० रुपये, सुगंधित तंबाखू ३६,००० रुपये, सुगंधित तंबाखू खुला २०,००० रुपये, शिशा टोबँको मजा 8,००० रुपये असा एकूण १ लाख २४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यामध्ये आरोपी राहुल पुरुषोत्तम खोब्रागडे, यांच्यावर अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६, सहकालम १८८, २७३, ३२८ भांदवी अन्वये गुम्हा दाखला करण्यात आला, एक आरोपी फरार असून त्याचा शोध सावली पोलीस 

घेत आहेत.सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक शशिकांत चिचघरे यांच्या मार्गदर्शनात पितांबर खरकाटे, विनोद वाघमारे, धिरज पिदुरकर, दर्शन लाटकर, विश्वास नखाते करीत आहे. सदरील कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.