इंदिरानगर गडचिरोली येथे श्रीरामनवमी उत्सव साजरा #jantechaawaaz#news#portal#

48
गडचिरोली:-  दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. रामनवमी हा सण हिंदू धर्मातील शुभ सण असून चेत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने चेत्र महिन्यातील पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला श्रीराम सेना यांच्या वतीने हनुमान मंदीर इंदिरानगर येथे घटस्थापना करुन श्रीराम जन्मउत्सवास सुरवात करण्यात आले. तसेच दि. २९ बुधवारला भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
. गुरवार दि.३० मार्च रोजी  रामनवमी निमित्त सकाळी दहा वाजता प्रभु श्रीरामाची विधिवत पूजा करून  सायंकाळला जय सियारामाच्या घोषणांचा गजर करीत बँजो पथकासह भक्तिमय
 वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
संपुर्ण इंदिरानगर राम नामाने दुमदुमले होते. 
यावेळी श्रीराम सेना प्रमुख सदस्य मार्कंडेश्वर सहारे, बबुष पठाण, गणेश मल्लेरवार, अंकुश चीलबुले, कैलाश भांडेकर, प्रीतम गावतुरे, कार्तिक विरवार, जय विरवार, अक्षय टटलावार, सारंग विरवार, देवा कुनघाडकर, अक्षय ईन्नमवार, समीर बोबाटे, प्रितम चापले, गिरीष
 पेंदाम, ऋषभ वरठे, आकाश सहारे, गोविंदा चव्हाण, अनिश काटवे, मयुर कुनघाडकर, निशांत कळसकर यांच्यासह इतर नागरीक उपस्थित होते.यात सर्व जातीधर्माचे लोक  एकतेचा संदेश देत सहभागी झाले.