टिकेपल्ली येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सवास शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे,शिवसेना युवा नेते संदीप भाऊ कोरेत यांची विशेष उपस्थिती

283

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

नृत्य कार्यक्रमाचे केले उद्घाटन

मुलचेरा तालुक्यातील महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवरील प्राणहिता नदीच्या काठावर वसलेल्या टिकेपल्ली या पवित्र तीर्थस्थळी महाशिवरात्री यात्रा मोठया उत्साहात साजरी केली जात आहे. या यात्रेनिमित दिनांक 27 फेब्रुवारी गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे,शिवसेना नेते संदीप कोरेत यांनी टिकेपल्ली येथील प्राणहिता नदीकाठी असलेल्या शिवशंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मनोभावे पुजा अर्चना केली.

यावेळी राधे नृत्य ग्रुप वर्धा यांच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उ्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते संदीप कोरेत होते.

यावेळी बोलताना शिवसेना नेते संदीप कोरेत यांनी यात्रेत उपस्थीत भाविकांना शुभेच्छा देत या यात्रा महोत्सवाचे सुंदर आयोजन करून शिवभक्तांची योग्य सोय केल्याबद्दल टिकेपल्ली वासियांचे व अयोजन मंडळातील सदस्याचे विशेष कौतुक केले. या तीर्थस्थळी भविष्यात पुन्हा सोयीसुविधायुक्त यात्रेचे आयोजन करण्यासाठी आपण नेहमी टिकेपल्ली वासियांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची ग्वाही दिली. व मनोरंजन कार्यक्रमाचा शांततेत आस्वाद घेण्याची विनंती केली.

शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी या पवित्र तिर्थस्थळी भाविक भक्तांनी संख्या दिवसेंदिवस वाढत असुन या ठिकाणी असलेल्या शिवमंदिराच्या सुसज्ज बांधकामासाठी नेहमी मदत करण्याची तयारी दर्शवत मंदिर बांधकामाला आर्थिक मदत केली. तसेच या पवित्र तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी पाहिजे ती मदत व पाठपुरावा करणार असल्याचे सांगत यात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांचे स्वागत केले. यावेळी अहेरी व मूलचेरा तालुक्यातील भाविक भक्तांनी एकच गर्दी उसळली होती. येथे पाच ते सहा दिवस मोठ्या उत्साहात यात्रा भरत असून महाराष्ट्रासोबतच लगतच्या तेलंगणा राज्यातील भाविकही दर्शनासाठी येत असतात.

यावेळी शिवसेना नेते अरुण शेडमाके, चुंट्रूगुंटाच्या सरपंच साधनाताई मडावी गुरुदास मडावी, दिनेश मडावी,आकाश कुमरे, कार्तिक कोरेत मनोहर सडमेक व अन्य उपस्थीत होते..