संस्कार पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

275

एटापल्ली: 28 फेब्रुवारी 2025: संस्कार पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी 35 वेगवेगळे वैज्ञानिक प्रकल्प सादर केले.

या प्रदर्शनीचे उद्घाटन तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री. ह्रिशिकेश बुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी “संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली विद्यार्थ्यांना लहान वयातच विज्ञानाच्या प्रयोगांची अभ्यासात्मक सवय लावते, ही स्तुत्य बाब आहे” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला केंद्रप्रमुख बर्लावार मॅडम, मूल्यमापन प्रा. डॉ. एस. बी. वडस्कर सर, श्री. एल. वाय. चौधरी सर, तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय संस्कार उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा संस्कार यांनी सर्वांचे आभार मानले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण, रोबोटिक्स, सौरऊर्जा, जलसंवर्धन यासारख्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि सर्जनशील संकल्पनांनी उपस्थितांची मने जिंकली.

या विज्ञान प्रदर्शनीला पालक आणि गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. “संस्कार पब्लिक स्कूलमध्ये आमचे पाल्य पाठ्यपुस्तकासह विषयांचा प्रयोगशील अभ्यास करत आहेत,” याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.

संस्कार पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आणि प्रयोगशील शिक्षण देऊन विध्यार्थी घडविणारी शाळा म्हणून संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली नावलौकिक मिळवत आहे, असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.