मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
रेपनपल्ली: आज दि २८/०२/२०२५ रोजी आदरणीय पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल सर,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशासन एम रमेश सर ,अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख सर ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा सर तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी श्री शशिकांत दासूरकर सर यांचे नियोजनपूर्ण नेतृत्वत्वाखाली जिल्हा पोलीस दल व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने उप पोस्टे रेपनपल्ली येथे भव्य जनजागरण मेळावा व निशुल्क वैद्यकीय शिबिर यांचे आयोजित करण्यात आला. उप पोस्टे रेपनपल्ली चे प्रभारी अधिकारी पो उप नि संतोष काजळे सा,मपोउपनि प्रियांका मेश्राम मॅ,पो उप नि सतीश पवार तसेच सीआरपीएफ चे इको/०९ कंपनीचे सहायक समादेशक श्री एन शशिधर,पोनि गणपत सिंग सर,पो नि जमातिया सर तसेच सीआरपीएफ चे मुख्य वैद्यकीय अधिकारी एन एस मोहन सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सीआरपीएफ चे सहायक समादेशक यांनी वैद्यकीय सुविधांचे महत्व अधिरेखित केले तसेच सीआरपीएफ यांचे कडून राबवल्या जाणाऱ्या निरनिराळ्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच ठाणे प्रभारी अधिकारी संतोष काजळे सा यांनी पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनाबद्दल माहिती दिली, तसेच नवीन कायदे,बालसुरक्षा,महिला सुरक्षा,बालविवाहाचे दुष्परिणाम,जादूटोणा सदरबाबत सखोल मार्गदर्शन केले.आजच्या निशुल्क वैद्यकीय तपासणी मधे हद्दीतील ३००-३५० महिला व पुरुष सहभागी होऊन त्यांचे बीपी,शरीरातील साखर,रक्ताशय तसेच लहान मुलांचे कुपोषणाशी संबधित आजार इत्यादींवर उपचार करण्यात आले.खालील साहित्यांचे वाटप करण्यात आले-
१)शेतीचे फवारणी पंप-२५
२)चार्जेबल इलेक्ट्रिक लैंप-५०
३)विले-१००
४)फावडे-५०
५)झाडाच्या कुंड्या-५०
६)क्रिकेट स्टंप -१०
७)व्हॉलीबॉल-१०
८)व्हॉलीबॉल नेट-१०
९)कॅरम बोर्ड-१०
१०)क्रिकेट बैट-१०
११)गवंडी कामासाठी थप्पी-५०
अश्या उपरोक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. मेळावा संपल्यानंतर सर्वांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले.