उर्स महोत्सव निमित्ताने दर्ग्यावर चादर चढवून घेतले आशीर्वाद
*सिरोंचा:-* जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा शहर येथे हजरत वली हैदर शाह बाबा र.अ.यांचा उर्स कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो.उर्स महोत्सवामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक सहभाग घेत असल्याने हा उर्स सामाजिक एकात्मतेचा प्रतीक मानला जातो.उर्स महोत्सवाला अंदाजे 400 वर्षाची परंपरा लाभलेली आहे.
उर्स महोत्सव निमित्ताने सिरोंचा येथे मोठी यात्रा भरली जाते.उर्स महोत्सवात संदल,कुराण पठण,ध्वज चढविणे आणि कव्वाली सारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता महाराष्ट्र,तेलंगाणा, छत्तीसगड या राज्याच्या कानाकोपऱ्यातुन सर्व जाती व धर्माचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात.
हजरत वली हैदर शाह बाबा र.अ. यांच्या उर्स महोत्सवाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्य सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी दर्ग्यावर चादर चढवून आशीर्वाद घेतले.यावेळी उर्स महोत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा सपत्नीक शाल,पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन स्वागत केले.त्या नंतर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित भाविकांना उर्स महोत्सवाबद्दल मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
या वेळी मंचावर उर्स कमिटीचे पदाधिकारी,आविस व बीआरएस चे पदाधिकारी सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!