जिमलगट्टा येथे जलशुद्धीकरण संयंत्र केंद्र उभारले मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते झाले लोकार्पण

153

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते झाले लोकार्पण

अहेरी:तालुक्यातील जिमलगट्टा येथील
जलशुद्धीकरण संयंत्र केंद्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम,युवा नेते ऋतुराज हलगेकर,सरपंच पंकज तलांडी, उपसरपंच वेंकटेश मेडी, ग्रा प सदस्य रुपाली तलांडी, किरण जणघरे, रक्षीका पोरतेट तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

जिमलगट्टा येथील नागरिकांच्या दृष्टिकोनातून पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत तर्फे गावातच जलशुद्धीकरण संयंत्र केंद्र उभारण्यात आले.यासाठी मोठी निधी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी उपलब्ध करून दिली होती.नुकतेच जलशुद्धीकरण संयंत्र केंद्राचे काम पूर्ण झाले असून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.

ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे समस्या मांडल्याने त्यांनी त्वरित निधी उपलब्ध करून दिली.अखेर जिमलगट्टा वासीयांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था झाली असून येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.