पोचम्मा देवी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती* *पूजाअर्चा करून मातेचे घेतले आशीर्वाद

44

*पूजाअर्चा करून मातेचे घेतले आशीर्वाद*

सिरोंचा:-तालुक्यातील बामणी येथे नुकतेच उभारण्यात आलेल्या नूतन माता मंदिरात पोचम्मा देवी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम घेण्यात आले. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी गावकऱ्यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थिती दर्शवून मातेचे आशीर्वाद घेतले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवेली,माजी प स सदस्य समय्या कुळमेथे,बामणी उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मदन म्हस्के,पोलीस उप निरीक्षक मुंडे,मुख्याध्यापक श्रीनिवास दशरथी,स्वामी दासरी, मनोज मंचालवार,ग्रा प सदस्य रवींद्र कार्सपल्ली,ग्रा प सदस्य शेपाली गड्डी,प्रतिष्ठित नागरिक सडवली मिसाल,पोचम कुमरम,वेंकटेश कोडापे,नागेश कुमरम,रोहित वेलादी, खुशाल पंधरम,अक्षय सडमेक,सुरेश मोरला,शंकर गड्डी,संजीव कुमार मेडी,तिरुपती बोगडामिधी, रमेश जूनगरी आदी उपस्थित होते.

बामणी गावात जुनं माता मंदिर होतं. त्याठिकाणी नूतन माता मंदिर बांधकाम करण्याचे गावकऱ्यांनी ठरविले होते.मात्र,मंदिर बांधकाम आणि इतर खर्च मोठा असल्याने गावकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली.स्थानिक पोलीस प्रशासन आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी सुसज्ज माता मंदिर उभारले आणि शुभ मुहूर्तावर पोचम्मा देवी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम घेतले.विशेष म्हणजे गावकऱ्यांचा श्रद्धेचे स्थान असलेल्या माता मंदिर बांधकामात कुठलीही अडथळा निर्माण न होऊ देता आर्थिक अडचण दूर केल्याने गावात माता मंदिर उभे झाले त्यामुळे गावकऱ्यांनी ताईंचे विशेष आभार मानले.

देवीची मूर्ती हे तेलंगाणा राज्यातील वारंगल येथून आणले असून 20 नोव्हेंबर रविवारी विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आले.यावेळी माता मंदिर परिसरातील बोनालू सर्वांचे लक्ष वेधून घेतले.