मरपल्ली : मा. पोलीस अधिक्षक गडचिरोली श्री. निलोत्पल सो., मा. अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोली श्री. अनुज तारे सो., मा. अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. कुमार चिंता सो., यांचे प्रेरणेने व मा. उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी श्री. सुजीतकुमार क्षीरसागर सो. यांच्या मार्गदर्शनात व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे आज दिनांक 19/ 11 /2022 रोजी सकाळी- 10:00 ते 17:00 वा. पावेतो *जनजागरण मेळावा आयोजन करून आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा, राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले.
कु. ममीता नैताम, सरपंच रेगुलवाही यांचे हस्ते वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून सदर स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास किशोर सडमेक पो. पा. तिमरम, रविंद्र कोरेत उपसरपंच, उमानूर, श्रीमती डॉ.लीना पाटील मॅडम, वैद्यकीय अधिकारी प्रा. आरोग्य केंद्र मरपल्ली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते..
सदर भव्य आदिवासी पारंपारिक रेला समुह नृत्य स्पर्धेमध्ये- 08 संघानी 03 एकल नृत्य स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
तसेच राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धेमध्ये-08 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. व आपापल्या हस्तकला वस्तू प्रदर्शित केल्या..
त्यामध्ये आदिवासी युवकांच्या/युवतींच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन उत्कृष्टरित्या आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. आदिवासी म्हणून आज पर्यंत वेगळेपण म्हणून जोपासलेली कला सादर केली..
* भव्य बिरसा मुंडा हॉलीबॉल
*आदिवासी पारंपारिक रेला
समुह नृत्य स्पर्धेमध्ये*
1) गोंडवाना रेला डांस ग्रुप – रेगुलवाही (प्रथम बक्षीस)
3000₹ रोख
2) डुडूर मरकाते रेला डांस ग्रुप – जोगनगुडा (द्वितीय बक्षीस)
2000₹ रोख
3) सिलमपल्ली पारंपरिक ढोल ग्रुप – सिलमपल्ली (तृतीय बक्षीस) 1000₹ रोख
*राणी दुर्गावती हस्तकला
स्पर्धेमध्ये*
1) मल्लेश वेलादी – सिलमपल्ली
(प्रथम बक्षीस) 3000 ₹.
2) सत्यमकुमार ईस्टाम -भस्वापूर
(द्वितीय बक्षीस) 2000₹
3) रतन दासर – मरपल्ली
(तृतीय बक्षीस) 1000₹
तसेच दि. 15,16/11/2022 रोजी घेण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम घेवून
1) टीम भस्वापूर टोला – प्रथम
3000₹ रोख व व्हाॅलीबाॅल, नेट
2) टीम दुब्बागुडम – व्दितीय
2000₹ रोख व व्हाॅलीबाॅल, नेट
3) टीम रेगुलवाही – तृतीय
1000₹ रोख व व्हाॅलीबाॅल, नेट
अशा प्रकारे स्पर्धेतील विजेता संघास बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच
*वर नमूद तिन्ही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावीणा-या संघास उपविभागीय स्तरावर पाठविण्यात येणार आहे.*
सदर स्पर्धा कार्यक्रमास हद्दीतील ग्राम रेगुलवाही, मुळेवाही, दुब्बागुडम, मोतुकपल्ली,सिलमपल्ली, भस्वापूर, मसाद, जोगनगुडा, तिमरम, मरपल्ली, उमानूर येथून मोठ्या संख्येने नागरिक, युवक, युवती शाळेतील विद्यार्थी/ विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित स्पर्धक व नागरिक यांना गडचिरोली पोलीस दलाला अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना तसेच विविध प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच तसेच सदर योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन *पोउपनि. संतोष जायभाये, प्रभारी अधिकारी, पोमके मरपल्ली* यांनी केले.
सदर दोन्ही स्पर्धेकरिता पोमके हद्दीतील 325 ते 350 नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमा दरम्यान सर्व नागरिकांच्या व स्पर्धकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती..
सदर स्पर्धा कार्यक्रम हा सकाळी 10:00 ते 17:00 वा.पर्यंत पोमके च्या सुरक्षितेसाठी इनर काॅर्डन बंदोबस्त लावून शांततेत पार पाडण्यात आला.
सदर स्पर्धे करीता पोउपनि. सोनवणे, पोउपनि. मैसनवाड, सर्व जिल्हा अंमलदार तसेच पोउपनि. संगवे रा. रा. पो. बल गट 7 दौंड व त्यांचे सर्व अंमलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले..
पोउपनि. संतोष जायभाये, प्रभारी अधिकारी, पोमके मरपल्ली यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
करीता माहितीस सविनय सादर.
संतोष जायभाये
पोलीस उपनिरीक्षक
पोलीस मदत केंद्र, मरपल्ली