पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करून द्या; नगर पंचायत उपाध्यक्ष यांच्याकडे निवेदन .

42

डिजिटल मीडिया सिरोंचा तालुका अध्यक्ष – सागर मूलकला यांची मागणी .
सिरोंचा :तालुका मुख्यालय येते  नगर पंचायत हद्दीत शासकीय जागा उपलब्ध आहेत,
तालुक्यातील आणि नगर पंचायतील शहरात पत्रकार भवन नसून प्रेस कंफ्रेंस मीटिंग साठी गरजू नागरिकांना मोठी समस्या निर्माण होत आहे,
       त्याकरिता नगर पंचायत हद्दीतील शासकीय जागेंवर सिरोंचा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेसाठी पत्रकार भवन ( सभागृहा ) साठी राखीव जागा कडून शासकीय जागेवर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेसाठी जागा उपलब्ध करुन ध्या अशी मागणी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष-सागर मूलकला यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार बांधवांनी सिरोंचा नगर पंचायत नगराध्यक्ष आणि नगर उपाध्यक्ष यांना निवेदन देऊन मागणी केली आहे,
     निवेदनची दाखल घेत नगर पंचायत उपाध्यक्ष बाबलू पाशा यांनी लवकरच जागा उपलब्ध करून देतील असे आश्वासन देखील देण्यात आली आहे,
       त्यावेळी निवेदन देतांना डिजिटल मीडिया पत्रकार बांधव सत्यम गोरा,  श्याम बेज्जनिवार, अशोक कुम्मरी, रवि बारसागाडी, शंकर जिमडे, जलील पाशा, देवेंद्र रंगू, साईनाथ दुर्गम, रवी सल्लम, राविकुमार येमुरला, सुधाकर सिडम, वेंकटस्वामी चकिनाला, श्रीनिवास दुर्गम यांची उपस्थिती होते,