. खुटगांव:दि,०८/०१/२३ रोजी मौजा- खुटगांव ता. धानोरा, जि. गडचिरोली येथील चैतन्य मुर्ती महिला बचत गट यांच्या सौजन्याने, प्रल्हाद नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत, ‘एक नारी सर्वांना भारी’ या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. नितीन कोडवते यांनी उद्घाटक म्हणून बोलतांना आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतिपथावर आहे. गावच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत ति आघाडीवर आहे. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्रथम महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी, पहिल्या पोलिस अधिकारी किरण बेदी, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, इ. अनेक स्त्रियांनी आपल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे.,स्त्री केवळ कुटुंबासाठीच झटत नाहि तर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, वीरांगना राणी दुर्गावती यासारख्या अनेक स्त्रिया मायभुमिच्या रक्षणासाठी रणरागिणी झाल्या आहेत., महिला फक्त चुल आणि मुलच नाहि तर प्रत्येक क्षेत्रात प्रगति करू शकतात. एक आदर्श कन्या, पत्नी, एक आदर्श शिक्षिका, आणि एक आदर्श समाजसेविका अश्या विवीधांगांनी ज्यांचे व्यक्तीमत्व संपन्न होते, अशा सावित्री बाई फुले यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा प्रभाव आजही समाजावर दिसत आहे. असे मत डॉ. नितीन कोडवते साहेब यांनी उद्घाटक म्हणून संबोधित करताना व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे सहउद्घाटक मनोहर पाटील पोरेटी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुभाऊ जिवाणी जी. प.सदस्य, सत्कारमूर्ती डी. एस. मेश्राम साहेब ग्रामविकास अधिकारी गडचिरोली, मोहनजी गावडे सरपंच, खुटगांव, उर्मिलाताई पदा माजी सरपंच खुटगांव, प्रभाकर देवलवार सहा.पो. उपनिरीक्षक गड, उईके साहेब से.नि.पि.एस.आय चातगाव, रेखाताई देवलवार शिक्षिका, किरनताई गेडाम पोलिस पाटील मेंढाटोला, राकेश हिचामी सर, अक्षय पेद्दीवार मुक्तिपथ धानोरा, रुपेश सलामे यांच्यासह मंचावर उपस्थित इतर मान्यवर,चैतन्य मुर्ती महिला महिला बचत गटाचे सदस्य, गावकरी व मोठया संख्येने नाट्य प्रेक्षक उपस्थित होते.