झाडीबोली साहित्य जतन करणाऱ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले अभिनंदन

57

*झाडी बोलीसाहित्य मंडळाच्या कवी संमेलनामुळे जिल्ह्यातील नवउत्साही कवींना उत्तम संधी*

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

*गडचिरोली येथे झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन*

*सहकार महर्षी प्रंचीत सावकार पोरेडीवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन*

*झाडीबोली साहित्य जतन करणाऱ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले अभिनंदन*

*दिनांक ८/१/२०२३ गडचिरोली*

*झाडी बोलीसाहित्य मंडळाच्या वतीने पुरस्काराचे वितरण व कवी संमेलनाच्या आयोजनामधून जिल्ह्यातील नवउत्साही कवींना उत्तम संधी मिळत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण व कमी संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी  सहकार महर्षी प्रंचीत सावकार पोरेडीवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मंचावर उपस्थित होते.*

*यावेळी  ग्रामगीताचार्य मा. बंडोपंतजी बोढेकर, डॉक्टर चंद्रकांतजी लेनगुरे, क्लब मेंबर दिलीपभाऊ उडान ,पंचायत समिती गडचिरोलीचे माजी सभापती  विलासभाऊ दशमुखे ,चामोर्शी भाजपा तालुका अध्यक्ष  दिलीपजी चलाख प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.*

*झाडीबोली साहित्याचे जतन करण्यासाठी झाडीबोली साहित्य मंडळाची स्थापना करणाऱ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी अभिनंदन केले. झाडी बोली साहित्यामुळे जिल्हयातील पारंपारिक परंपरा व संस्कृतीचे संवर्धन होण्यास मदत मिळते आहे. . या  झाडी बोली साहित्याने भविष्य काळामध्ये  आपल्या जिल्ह्यातील  जुन्या जाणत्या साहित्याची व संस्कृतीची ओळख होण्यास नवउत्साही लेखक, कवींना, जनतेला  माहिती मिळण्यास मदत मिळेल असे आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.*