#BJP# चिचबोडी फाटा येथे झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तींना खासदार अशोक नेते यांची सामान्य रुग्णालय येथे भेट

109

दिनांक ९ मार्च २०२३

सावली:सावली तालुक्यातील चिचबोडी फाटा येथे काल दोन गाडी मोटारसायकल स्वारांनी एकमेकांना धडक दिली असता यामध्ये निमगांव येथील दिनेश लाटकर,संदिप खेडेकर व गेवरा चे रोजगार सेवक पुंडलिक वाढणकर हया युवकांचा अपघात झाला या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या 

अपघातग्रस्त व्यक्तीस सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले. या संबंधित माहिती गेवराचे सरपंच मोहन चन्नावार यांनी दूरध्वनीवरून तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांना सांगितले असता यासंबंधी तात्काळ दाखल घेत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या तब्बेत ची व आरोग्याची विचारपूस केली.

यावेळी जिल्हा जिल्हाध्यक्ष तथा सावली तालुका भाजपा अध्यक्ष अविनाश पाल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, भाजपाचे कार्यकर्ते अभय लाटकर व अपघात ग्रस्त असलेल्या युवकांचे नातेवाईक व पदाधिकारी उपस्थित होते.