आरमोरी:- आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्या कार्यालयात क्रांतीवीर बाबुरावजी शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या हस्ते क्रांतीवीर योध्दा बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जंकास संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे,सचिव गिरीधर नेवारे,संचालक यादवराव कहालकर,सुरेश मेश्राम,लिपिक गुणवंत जाभुळे,आकाश सडमाके,संपन चौके यासह अन्य नागरीक उपस्थित होते.