#Armori#आज ठानेगाव जुना फाट्यावर शेतक-यांना कृषीपंपासाठी 24 तास विज पुरवठा करण्यात यावे

49

यासह वासाळा, चामोर्शी माल परीसरातील वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चक्का जाम आंदोलन
 
आरमोरी –  गडचिरोली जिल्हातील आरमोरी तालुक्यातील वासाळ, चामोर्शी माल, डोगरगाव, शिवणी, करपडा, लोहारा आणि इतर क्षेत्रातील शेतक-यांनी उन्हाळी फसल (धान) लावलेला असुन काहींचे रोवणे चालु आहेत तर काही ठिकाणी पाणी नसल्याने शेतकरी शेतीला पाणी लावण्यासाठी रात्रीची लाईन असल्याने रात्री (रात्री बारा वाजता शेतावर जावे लागते) लोडशेटींग 8 तास असल्यामुळे शेतीला पाणी घेणे शक्य
 नसल्यामुळे धान पिक करपत आहेत. परंतु काल दिनांक 06/03/2023 पासून या परीसरात वाघाची दहशत निर्माण झाल्यामुळे शेतक-यांना शेतावर जावून पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे धान मका पिकासह ईतर पिकाची नुकसान होत असल्याने कर्जबाजारीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतक-यांच्या कृषी पंपाना 24 तास विज पुरवठा करून तसेच चामोशी वनखी ठानेगाव वासाळा परीसरातील वाघाचा बंदोबस्त करुण जंगलातील राणडुकरानी धान मका ईतर भाजीपाला पिकाची नुकसान केल्याने भरपाई देण्यात यावे 
या मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 13/03/2023 ला दुपारी 12 वाजता जुना ठाणेगाव बस स्टँड फाटयावर गडचिरोली आरमोरी रस्त्यावर चक्का जामआंदोलन करण्यात येत आहे.
तरी ठानेगाव चामौशी वासाळा डोंगरगाव सायगाव शिवानी वनखी डोगरसावगी देऊळगाव वैरागड लोहारा यासह परीसरातील शेतकरी शेतमजूर नागरीक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे नगरसेवक अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केले आहे.