आलापल्ली ग्रामपंचायतेत तेंदुपत्ता लिलाव प्रक्रियेत मोठा घोटाळा नागरिकांचे आर्थिक नुकसान* *अहेरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत हीच परिस्थिती* *ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल*

358

प्रतिनिधि//

*अहेरी:-* जिल्ह्यासह तालुक्यात तेंदुपत्ता हंगाम सुरू झाला असतांना आलापल्ली ग्रामपंचायतेत तसेच अहेरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती मधे तेंदुपत्ता लिलाव प्रक्रियेत घोटाळा झालेला आहे. कोनतीही पारदर्शकता दिसुन आलेली नाही. वृत्तपत्रात जाहिरात न देता, ग्रामसभा न घेता व आदिवासी बांधवांना व ग्रामवासीयांना विश्वासात न घेता ग्रामसेवक यांनी आपल्या संपर्कातील तेंदुपत्ता ठेकेदाराला बोलवुन स्वतः किंमत ठरवून तेंदुपत्ता युनिट देण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अधीक दर मिळालेला नाही. या तेंदुपत्ता निलाव प्रक्रियेत मोठा घोटाळा करणाऱ्या ग्रामसेवक व संबंधीत अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आले. व यासंबंधी चैकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

निवेदन देताना भाजपा चे माजी तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, आलापल्ली ग्रामपंचात पेसा अध्यक्ष दिपक तोगरवार, तालुका अध्यक्ष विकास तोडसाम , अभीजीत शेंडे, अंकुश शेंडे , सागर बिट्टीवार व पदाधिकारी उपस्थित होते.