महागाव व किष्ठापूर ग्रामपंचायतीवर काँग्रेस व आविसंची झेंडा. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजपला जोरदार धक्का

309

प्रतिनिधि//

अहेरी : तालुक्यातील महागाव व किष्ठापूर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बाजी मारली आहे.विशेष म्हणजे यापूर्वी किष्ठापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकहाती सत्ता होती आणि महागाव ग्रामपंचायवर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्ता होती.

आज पार पडलेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणूक आविसं,काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली.

यावेळी महागाव ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून वंदना दुर्गे तर किष्ठापूर ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून नरेंद्र मडावी हे बिनाविरोध निवडून आले.नवनियुक्त दोघेही सरपंच हे आविस व काँग्रेस पक्षाचे आहेत.त्यावेळी अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांनी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले.

किष्ठापूर ग्रामपंचायतीवार सरपंचांवर अविश्वास आणून आविस व काँग्रेसने दोन्ही ग्रामपंचायतीवर कब्जा केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी समोर सत्ताधारी पक्षांना जबर राजकीय धक्का बसलेलं आहे.

आजच्या सरपंच पदाच्या निवडणुकीला माजी उपसरपंच अशोक येलमुले,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुनीता कूसनाके,माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलम,माजी सभापती गीता चालूरकर,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,संगीता आत्राम,सोनी गर्गम,विनायक वेलदी,लालू वेलदी आणि किष्ठापूर ग्रामपंचायतचे सदस्य दादाराव मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,रसिका सडमेक,मयुरी तलांडे,योगिता करपेत,अनुराधा सर्धार,वनिता सडमेक,राकेश अग्गुवार,पुणेश कंदीकुरवार,संतोष,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.