मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलेली बससेवा ठप्प – नागरिकांचा संताप, नवीन बस व फेऱ्यांची मागणी जोरात

41

प्रतिनिधी//

एटापल्ली, ७ मे – १ जानेवारी रोजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली एटापल्ली ते वांगेतूरी बससेवा सध्या अक्षरशः नागरिकांच्या अडचणीचे कारण बनली आहे. उद्घाटनानंतर केवळ काही महिन्यांत ही बस दिवसातून दोन वेळा रस्त्यावर बंद पडत असून, नागरिकांचे शासकीय, आरोग्यविषयक व वैयक्तिक कामकाज खोळंबत आहे.

बस चालते की उभी राहते?
सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे. ७ मे रोजी सकाळी ११ वाजता बस गट्टा परिसरात बंद अवस्थेत उभी होती, आणि त्यानंतर दुपारी ती तुमुरगुंडा परिसरात पुन्हा बंद पडलेली दिसून आली. ही गंभीर परिस्थिती बघता बस व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जुनी बस, वारंवार बिघाड
सदर मार्गावर नवीन बसऐवजी जुनी, जीर्ण बस पाठवण्यात आली असून, ती सातत्याने बिघडते. एका दिवसात दोन वेळा बंद पडल्यामुळे प्रवाशांना प्रवास अपूर्ण ठेवून परतावे लागत आहे. परिणामी, शासकीय कार्यालयीन कामे, आरोग्य सेवा, आणि इतर महत्त्वाच्या गरजा रखडल्या जात आहेत.

मेड्री-रमणटोला व गट्टा क्षेत्रातील नागरीकांचे हाल
मेड्री व रमणटोला भागातील नागरिकांसाठी कोणतीही थेट बससेवा उपलब्ध नसल्याने त्यांना वांगेतूरी येथे मुक्काम करावा लागत आहे. ही स्थिती विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि वृद्धांसाठी अत्यंत कठीण आहे.

गट्टा मार्गासाठी दोन बसफेऱ्यांची मागणी
गट्टा, गर्देवाडा, वांगेतूरी, मेड्री या सुमारे ७० किलोमीटर अंतराच्या भागात लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे स्थानिकांनी मागणी केली आहे की एटापल्ली ते गट्टा मार्गावर दररोज कमीत कमी दोन वेळा बसफेरी चालवण्यात यावी.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या:

1. सद्यस्थितीत धावणाऱ्या जुनी बस हटवून नवीन बस नेमण्यात यावी.

2. मेड्री-रमणटोला भागासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात यावी.

3. गट्टा मार्गावर दररोज दोन वेळा बसफेरी चालवण्यात यावी.

सचिन मोतकुरवार भाकपा अहेरी विधानसभा प्रमुख यांच्यासोबत बोलणे झाले तर त्यांचं म्हणे होत कि
लोकप्रतिनिधी, प्रशासन व परिवहन विभागाने त्वरित लक्ष घालून या मागण्या पूर्ण न केल्यास, नागरिक व भारतीय कम्युनिष्ठ पक्षांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे…