देसाईगंज उपविभागीय अधिकारी यांचे प्रशासकीय निर्णय व जमिनीच्या संदर्भातील आदेश

168

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

वडसा (जूनी) येथील सर्वे नंबर २०३/१ आराजी ०.३८ अकृषक नाही किंवा वाढीव गावठाणा मध्ये नसतांनी व शेतजमीन असतांनी बेकायदेशीर लेआउट पाडून सर्वे नंबर २०३/१ /१ ते २०३/१/१७ या प्रमाणे ०.०२ हेक्टर आर व ०.०३ हेक्टर आर तुकडे पाडून स्वतंत्र तयार करुन, तुकडे बंदीच्या कायद्याचे उल्लंघन करून, हिना तारीक जादा यांनी सदर भूखंड विक्री केल्या असल्यामुळे ७/१२ सदर भूखंडाचे ७/१२ रद्द करणे बाबत तक्रारकर्ते, रवींद्र बाबुराव कुथे, राहणार चोप, तहसील देसाईगंज, जिल्हा गडचिरोली यांनी या संदर्भात क्र.०३ नुसार तहसीलदार देसाईगंज यांनी, संदर्भीय पत्र क्रमांक ५ अन्वये मौजा वडसा येथील सर्वे क्र. २०३/१ आराजी ०.३८ हेक्टर आर भोवर्ग १ कृषक जमिनीचे अकृषक न करता प्लॉट पाडून विभाजन केलेले आहे, व तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे, असे अहवाल तहसीलदार देसाईगंज यांचेकडून सादर केले आहे.
यामध्ये नमूद केल्याप्रमाणे, सर्वे क्रमांक २०३/१, आराजी ०.३८ हे. आर. क्षेत्र अंतर्गत, संबंधित मालमत्तेच्या मालकी हक्कासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जमिनीच्या सीमांकन व इतर प्रक्रियांसाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
भूखंडाच्या वापरासंदर्भात शासन निर्णय १९६६ अंतर्गत नियम पाळले जात आहे. या आदेशाने सदर २०३/१/१ ते २०३/१/१७ मौजा वडसा जूनी येथील सातबारे उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांचे आदेशानुसार रद्द करण्यात येत आहे.