अहेरी विधानसभा क्षेत्राचे सोशल मीडिया अध्यक्ष गोपाल कविराज यांनी  जिल्हा परिषद शाळा गिताली येथे समस्या जाणून घेतले

126

मुलचेरा:-
तालुक्यातील ग्राम पंचायत शांतिग्राम अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा गिताली  या शाळेची ” सरकार बदलतात पण शाळांच्या समस्या कायम राहतात” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती. ही बातमी अहेरी विधानसभा सोशल मिडिया अध्यक्ष श्री गोपाल कविराज यांनी ऐकीव माहितीच्या आधारे दिली होती. सदर माहिती चुकीची असून त्याबद्दल गोपाल कविराज यांनी दिलगिरी व्यक्त केली असून, त्यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचेकडून माहिती घेऊन प्रत्यक्ष वालकंपाऊंड 45 मीटर व षट्कोन बिल्डिंग रिपेरिंग किचनशेड दुरुस्ती सि.सि रोड मेन गेट ते शाळा पर्यंत रेलिंग पुर्ण ( रॅम्प) शालेय रंगरंगोटी इलेक्ट्रिक फिटींग . सोयीसुविधा बघितले असता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी थंड व शुद्ध पाण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये स्वच्छतागृह अद्ययावत असून शाळेला 50 मी. संरक्षण भिंत, एक वर्ग खोली दुरुस्ती व स्वयंपाकगृह दुरुस्तीची आवश्यकता आहे.
           तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये भौतिक सुविधांची पुर्तता करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात यावे व विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधांची पूर्तता व्हावी अशी मागणी अहेरी विधानसभा सोशल मिडिया अध्यक्ष श्री गोपाल कविराज यांनी केली.