माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन #jantechaawaaz#news#portal#

50

शनिवारपासून सुरू झालंय रेपणपल्ली प्रीमियम लीग

अहेरी:-तालुक्यातील रेपणपल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन शनिवारी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्पर्धेचे सह उदघाटक म्हणून ग्राम संघटनेचे अध्यक्ष कमला सिडाम, कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील सरपंच लक्ष्मीताई मडावी,प्रमुख पाहुणे म्हणून उमानूर चे सरपंच श्रीनिवास गावडे,पोलीस पाटील कमला सडमेक,लक्ष्मण येलाम,मीना

 पोरतेट,रुकमाबाई गावडे, मंता पोरतेट,कृष्णा किर्तीवार,स्नेहदीप आत्राम,सुदीप रंगूवार,वेंकटी उलेंदला आदी मान्यवर उपस्थित होते.

रेपणपल्ली येथील मांतय्या पटांगणावर पोहोचताच भाग्यश्री ताई आत्राम यांचे गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून विधिवत पूजा करून या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.उदघाटन सोहळा आटोपतच ताईंनी स्वतः मैदानात खेळ दाखवून जोरदार फटकेबाजी केले.

पहिल्यांदाच आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी परिसरातील क्रिकेट चमुनीं मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 25 हजार,द्वितीय 20 हजार तर तृतीय पारितोषिक 15 हजार रुपये ठेवण्यात आले.