जोगीसाखरा -: येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव दि ११ ते १४ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमानी साजरा केला जाणार असुन दि ११ एप्रिल ला क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ९ वाजता महात्मा फुले जयंती तथा मागदर्शन तसेच रात्रौ ७ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार समाज भूषण पुरस्कारप्राप्त गायक गीतकार संगीतकार मनोज राजा गोसावी यांचे समाज प्रबोधन कार्यक्रम होणार
आहे तसेच दिनांक १२ एप्रिल ला मुले मुली महिलांचे गीत गायन व नृत्य दि.१३ एप्रिल ला धम्मप्रबोधन १४ एप्रिल ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती तथा मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण मानवंदना व मार्गदर्शन तसेच दुपारी १२ वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मडळ. ग्रामपंचायत तसेच श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्या
वतीने रक्तदान शिबीर सायंकाळी धम्म रॅली तरी या जयंती महोत्सवास मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलें आहे.