मंडल पुजेत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती
विधिवत पुजा करून घेतले आशीर्वाद
सिरोंचा:-तालुक्यातील प्रभाग क्रमांक दोन मधील श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिरात मंगळवारी ध्वजस्तंभ प्राणप्रतिष्ठा प्रित्यर्थ मंडल पुजेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी उपस्थित राहून विधिवत पुजा करून आशीर्वाद घेतले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,नगरसेवक सतीश भोगे,नगरसेवक नागेश्वर गागापूरवार,राकॉचे सिरोंचा तालुका कोषाध्यक्ष मदनय्या मादेशी, नगरसेवक रंजीत गागापूरवार,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेली,सिद्धेश्वर हनुमान मंदिर कमिटी चे सदस्य तसेच परिसरातील भक्तगण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजस्तंभ उभारण्यात आले.त्यानंतर प्राणहिता नदी व कालेश्वर संगम येथील जल पंचामृताने ध्वजस्तंभ व देवता अभिषेक करून हवन कार्यक्रम करण्यात आले.या सर्व कार्यक्रमात भाग्यश्रीताई आत्राम यांनी सहभाग घेत मंदिरात विधिवत पूजा करून सर्वांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून अगदी वेळेवर उपस्थिती दर्शविल्याने सिद्धेश्वर हनुमान मंदिर कमिटीतर्फे भाग्यश्रीताई आत्राम यांचे शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमात शेकडो भक्तगण उपस्थित होते.