जिल्ह्यातील शेतकरी व नागरिक यांचे उन्नती होण्यास देवितांकडे साकडे घातले
सिरोंचा: तालुक्यातील सोमनपली (नल्लाकंपा) नाल्यावर समक्का-सारकका देवस्थान प्रसिध्द आहे. सदर देवस्थान ठिकाणी दर तीन वर्षांनी या ठिकाणी भला मोठा यात्रा भरतो. या यात्रेत सिरोंचा तालुक्या सह छत्तीसगड राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात.
दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ या दोन दिवसीय जत्रा भरला असून जत्रेत परिसरातील भाविकांची तुडुंब गर्दी उसळली.सदर यात्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत भेट देऊन श्री श्री श्री समक्का सारकका देवीचे दर्शन घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांचे व नागरिकांचे उन्नती करिता देवीस मनोभावे पूजन केले.
संदीपभाऊ कोरेत यांची देवस्थान ला भेट दिल्या वेळी देवस्थान प्रशस्त मंडळ ने संदीपभाऊ कोरेत यांची वाजत गाजत ढोलने मनोभावे तिलक लावून दुपट्टा देऊन स्वागत करून देवीच्या दर्शनासाठी पाचारण केले. या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत सह, मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुडकर, विहिप चे चंद्रपूर विभाग सहमंत्री अमित बेझलवार, विहिप अहेरी जिल्हा सहमंत्री रमेश बामनकर, मनसे चे सिरोंचा तालुकाध्यक्ष वसंत डुरके,अहेरी चे तालुका उपाध्यक्ष संदीप चंदावार, रंगयापली ग्राम प्रमुख प्रणय ठाकूर,अहेरी चे सामाजिक कार्यकर्ते आकाश कुमरम, विहिप जिल्हा सहमंत्री समन्ना ओलाला, मनसे चे सल्लागार मनोहर शेडे, असरअली चे सामाजिक कार्यकर्ते दामोदर चापडी आदी उपस्थित होते.