दिनांक- 27/01/2025 गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत जिल्ह्रातील आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांकरीता ‘वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

21

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

श्व् गडचिरोली जिल्ह्रातील 112 आश्रम शाळामधील एकुण 23,935 विद्याथ्र्यांनी दिली सामान्य ज्ञान परीक्षा

गडचिरोली जिल्ह्रातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्याथ्र्यांला योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेत मागे पडत आहेत. त्याकरीता आश्रम शाळेच्या विद्याथ्र्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील आश्रम शाळा व समाज कल्याण विभागातील विद्याथ्र्यांकरीता घ्ङज्ञ्ॠच्-(घ्ग्र्ख्र्क्ष्क्क ङकॠक्क्तक्ष्ग़्क्र ग्र्छच्र् च्र्ग्र् ज्ञ्ग्र्छच्र्क्तच् ः च्च्र्छक़्कग़्च्र्च्) या उपक्रमांतर्गत दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासुन ‘वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा’ सुरु करण्यात आली होती.
सदर स्पर्धा राबविण्याकरीता जिल्ह्रातील 112 शासकिय व निमशासकिय आश्रम शाळेमधील 01 समन्वय शिक्षक व आश्रम शाळा ज्या पोस्टे/उपपोस्टे/पोंमके मधील 01 समन्वय पोलीस अधिकारी व समन्वय पोलीस अंमलदार यांना घ्ङज्ञ्ॠच् (सामान्य ज्ञान) वाट्सअप ग्रुप तयार करुन या ग्रुपमध्ये अॅड केले होते. सदर स्पध्र्येमध्ये आश्रम शाळांना व्हॉट्सअॅपव्दारे रोज 10 प्रश्न पाठविण्यात येत होते व आश्रम शाळेतील समन्वय शिक्षक दैनंदिन परिपाठामध्ये विद्याथ्र्यांना प्रश्न विचारुन त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह सांगत होते. अशा प्रकारे सदर उपक्रम 06 महिणे चालविल्यानंतर आज दिनांक 27/01/2025 रोजी ‘वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान वार्षिक स्पर्धा’ अंतीम परीक्षा गडचिरोली जिल्ह्रातील 112 आश्रम शाळेमधील 23,935 विद्याथ्र्यांनी दिली. सदर परीक्षेमध्ये गुणवत्तापुर्वक विद्याथ्र्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे माहे जानेवारी 2024 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या पोमकें गर्देवाडा हद्दीतील भगवंतराव आश्रम शाळा, गर्देवाडा येथील 116 विद्याथ्र्यांनी सदरची परीक्षा दिलेली आहे. यासोबतच अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांनी परीक्षेदरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली व एकलव्य रेसिडेन्शिअल इंग्लीश मिडीयम स्कुल, गडचिरोली (चामोर्शी) येथे भेट देऊन उपस्थित सर्व परिक्षार्थी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी व सर्व समन्वय अधिकारी, आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक व समन्वय शिक्षक तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके, पोअं/रविंद्र कंकलवार व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.