मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
दिनांक- 28/01/2024
गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणायांवर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिनांक 28/01/2025 रोजी रात्रीच्या सुमारास दोन वाहनांमध्ये जनावरे अवैधरित्या भरुन मौजा देसाईगंज ते जुनी वडसा रोडने जाणार आहेत. अशा गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देसाईगंजचे पोनि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने मौजा जुनी वडसा रोड वरील पोपटी लॉनजवळ सापळा रचुन पाळत ठेवली असता, देसाईगंज ते जुनी वडसा रोडवर दोन वाहने संशयीतरित्या येतांना दिसुन आले. त्यावेळेस सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करुन दोन्ही वाहनांना थांबवुन सदर वाहनांची तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. वाहन क्रमांक 1) एमएच 40 सी.डी. 8649 अशोक लेलँड टाटा कंपनीची ज्याचा चालक नामे प्रणय राजेंद्र बुल्ले, वय 21 वर्षे रा. देऊळगाव, ता. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर यांचे ताब्यातील वाहनात 05 बैल, प्रति बैल विक्री किंमत 20,000/- त्याचप्रमाणे वाहन क्रमांक 2) एम एच 36 ए. ए. 0076 बोलेरो पिकअप वाहन ज्याचा चालक नामे राजेश सोमेश्वर बावनकर, वय 24 वर्षे, रा. वेळवा, ता. पवणी, जि. भंडारा याचे ताब्यातील वाहनात 07 बैल प्रति बैल विक्री किंमत अंदाजे 15,000/- रुपये असे एकुण दोन्ही चारचाकी वाहनात 12 गोवंशीय जनावरे ज्यांची एकुण किंमत 2,05,000/- रुपये 12 गोवंशीय जनावरे व दोन चारचाकी वाहन अंदाजे एकुण किंमत 13,75,000/- असा एकुण 15,80,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे 1) सचिन मधुकर बावनथळे, वय 25 वर्ष, रा. येंगलखेडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली (बैल मालक) 2) प्रणय राजेंद्र बुल्ले, वय 21 वर्षे रा. देऊळगाव, ता. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर 3) राजेश सोमेश्वर बावनकर, वय 24 वर्षे, रा. वेळवा, ता. पवणी, जि. भंडारा यांच्यावर पोलीस स्टेशन, देसाईगंज येथे अप. क्र. 033/2025 कलम 5 (अ),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1976, सहकलम 11 (ड) (ई) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा 1960, सहकलम 3 (5) भान्यासं, सहकलम 119 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे देसाईगंज पोनि. अजय जगताप यांचे नेतृत्वात सफौ./1486 विनोद बोगा, पोहवा/2241 राजु उराडे व पोअं/8035 अजय दुर्गम यांनी केलेली आहे.